जागतिक साहित्य दिनाच्या अनुषंगाने मुरगुड मध्ये सायकल तिरंगा फेरीचे आयोजन

मुरगुड(शशी दरेकर) जागतिक सायकल दिनाच्या निमित्य ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी दाखवलेले अतुल्य शौर्य आणि शहिदांचा गौरव करण्यासाठी तिरंगा सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले होते.

Advertisements

यावेळी शहरवासियांनी मोठा प्रतिसाद दिला. मुरगुड शहरांमध्ये पर्यावरण प्रेमींच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षीही सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी शिवतीर्थ येथे जमण्याचे आवाहन सोशल मीडिया मार्फत करण्यात आले होते.

Advertisements

यावेळी ऑपरेशन सिंदूर मध्ये भारतीय जवानांनी गाजवलेल्या पराक्रमाच्या गौरवात सर्वत्र तिरंगा यात्रा निघत आहेत. मुरगूड शहरवासीयांनी सायकल फेरीद्वारे अनोखी तिरंगा यात्रा काढली. हातामध्ये तिरंगा ध्वज घेऊन तरुण सायकलवर स्वार होत या फेरीमध्ये सहभागी झाले होते.

Advertisements

ही फेरी शिवतीर्थ मुरगुड मार्गे जवाहर रोड, नवी पेठ मुरगुड पोलीस स्टेशन ,तुकाराम चौक ,बस स्थानक परिसर या मार्गावरून शिवतीर्थ मुरगुड येथे समाप्त करण्यात आली.

या फेरीमध्ये पर्यावरण विषयक आणि भारतीय सैन्याच्या गौरवाच्या घोषणा देण्यात आल्या. दरवर्षी मुरगूड शहरातील पर्यावरण प्रेमी सायकल फेरी, वृक्षारोपण, हवाई बीज पेरणी, ओढे नाले, तलाव नदी आणि शहर परिसर स्वच्छता मोहीम या माध्यमातून पर्यावरणाचा गौरव करत असतात.

यावर्षीही रॅली मोठ्या उत्साहात काढण्यात आली या रॅलीमध्ये स्वच्छता निरीक्षक सचिन भोसले, सर्जेराव भाट, ओंकार पोतदार, स्वच्छता मुकादम बबन बारदेस्कर, तानाजी भराडे , गजानन साळुंखे,संकेत शहा, शिवाजी चौगुले, अनुबोध गाडगीळ, हर्ष भाट, दिलीप कांबळे, सुभाष अनवकर, जगदीश गुरव, आनंद रामाणे, धनंजय सूर्यवंशी, प्रफुल्ल कांबळे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!