मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील राजर्षी शाहू नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित होम मिनिस्टरमध्ये सौ सुजाता संभाजी चौगले या प्रथम क्रमाकाने मानाच्या पैठणी साडीच्या व चांदीच्या पैंजणाच्या मानकरी ठरल्या.
या स्पर्धेतील दुसरा व तिसरा क्रंमाक अनुक्रमे सौ जयश्री श्रेयस देवडकर व सौ अश्विनी गजानन पाटील यांना मिळाला .त्यांना बनारसी साडी चार भार चांदीची जोडवी व म्हैसूर साडी व तीन भार चांदीचा छल्ला असे बक्षिस मिळाले . तर उत्तेजनार्थ क्रंमाक सौ प्रतिक्षा प्रविण मिसाळ यांना मिळाला . या स्पर्धेत इतर सहभागी महिलांना स्टेनलेस्टील तवे भेट देण्यात आले.

स्पर्धेचे उदघाटन व बक्षिस वितरण सौ संजना विरेंद्र मंडलिक यांच्याहस्ते व ॲड नीता मगदूम ‘ माजी जिल्हापरिषद सदस्या सौ शिवाणी भोसले संस्था सभापती दत्तात्रय सोनाळकर ‘ संचालिका सौ सविता कळांद्रे.यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
होम मिनिस्टर स्पर्धा संचलन सिने अभिनेते मदन पलंगे यांनी केले . या कार्यक्रमात राजर्षी शाहू पत संस्थेचे उपसभापती रविन्द्र ढेरे यांनी स्वागत केले . संचालक एन .वाय . पाटील यांनी प्रास्ताविक केले . जनरल मॅनेजर ज्ञानदेव पाटील यांनी संस्था प्रगतीचा व सुवर्ण महोत्सवी वर्ष उपक्रमांचा आढावा घेतला .
कार्यक्रमास श्रीमती आशालता भोसले ‘ श्रीमती मीनाताई गंगापूरे ‘ माजी उपनगराध्यक्षा सौ . रंजना मंडलिक ‘ सौ . अनुराधा राऊत ‘ संस्था संचालक दत्तात्रय भोई ‘रामचंद्र भोपळे ‘ प्रदीप चव्हाण आदि उपस्थित होते संचालक नारायण मुसळे यांनी आभार मानले.