कणेरी केबल चोरट्याला गावकऱ्यांनी पकडून पोलिसांच्या दिले हवाली

गोकुळ शिरगाव (सलीम शेख) :  कणेरी येथे काल मंगळवारी दुपारी कणेरी येथील पाझर तलावाजवळ संदीप पाटील यांच्या पाण्याच्या मोटारीची २०० फूट कॉपर केबल चोरी करताना किशोर हनुमंत माने (वय ३१, रा. शुक्रवार पेठ, कोल्हापूर) याला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडले. यावेळी त्याचा एक साथीदार पळून गेला, असे प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितले.

Advertisements

चोरी करताना पकडलेल्या केबलची किंमत सुमारे १२ हजार रुपये असून ती बेस्ट क्वॉलिटी कंपनीची आहे. या घटनेनंतर शेतकरी संदीप अशोक पाटील (वय ४०) यांनी गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात तातडीने तक्रार दाखल केली.

Advertisements
https://gahininathsamachar.com/read-online-gahininath-samachar-ank-34/

गावातील  एका शेतकऱ्याने दिलेल्या माहितीनुसार चोरने चालू केबल दगडाने ठेचून तोडून चोरी केली व लोक दिसतातच शेतात लपून बसला होता. यावरून असे दिसते की चोरी सराईत असवा? या भागात अश्या अनेक चोऱ्या झालेल्या आहेत यात लाखो रुपये चे साहित्य चोरीला गेले आहे.

माहितीनुसार पोलिसांनी त्वरित कारवाई करत संशयित आरोपी किशोर माने याला अटक केली असून, चोरीचा केबल जप्त केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्याचे हेडकॉन्स्टेबल संदेश कांबळे करत आहेत.

Advertisements

Leave a Comment

error: Content is protected !!