गहिनीनाथ समाचार अंक १९ दिनांक २७-०१-२०२५
रौप्यमहोत्सवी गहिनीनाथ समाचार गेली २५ वर्ष अखंडित दर सोमवारी प्रकाशित होत असून गेले २१ वर्ष शासनमान्य जाहिरात यादीवर आहे. देशातील घडामोडी तसेच परिसरातील घटना निर्भीडपणे मांडण्याचा आमचा प्रयत्न असतो.
शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, राजकारण, अंधश्रद्धा, शेती, युवकांच्या समस्या अशा अनेक प्रश्नावर ‘गहिनीनाथ समाचार’ मध्ये लिहिले जाते. प्रबोधनात्मक अनेक लेखावर चांगल्या प्रतिक्रिया देत असतात. ‘गहिनीनाथ समाचार’ चे संस्थापक संपादक स्व. दिलीपरावजी सणगर यांच्या पत्रकारितेचा वारसा आम्ही चालवत आहोत.