ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेचा अभूतपूर्व यश!

कागल (सलीम शेख) :  ना. गोपाळ कृष्ण गोखले विद्यामंदिर शाळेने नुकत्याच झालेल्या विविध स्पर्धांमध्ये अप्रतिम यश संपादन करून शाळेचे नाव उंचावले आहे.

Advertisements

25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त आयोजित घोषवाक्य स्पर्धेत शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवून शाळेला अभिमान वाटण्याचे कारण दिले. आफान बागवान, खुशी शर्मा आणि सोमांश कोरवी या विद्यार्थ्यांना प्रांत प्रसाद चौगुले आणि कागलचे तहसीलदार अमरदीप वाकडे यांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले.

Advertisements

26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त तहसील कार्यालयात आयोजित सांस्कृतिक स्पर्धेतही शाळेने उत्कृष्ट नृत्य सादर करून प्रमाणपत्र प्राप्त केले.

Advertisements

या सर्व यशासाठी शाळेचे मुख्याध्यापक सागर नदाफ, शिक्षक सचिन गाडेकर आणि पिष्टे सर यांचे मार्गदर्शन महत्त्वाचे ठरले. या कार्यक्रमात राहुल चौगुले, महेश मगर, निहाल जमादार आणि पत्रकार सलीम शेख प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या शाळेच्या यशाबद्दल पालक आणि नागरिकांमध्ये उत्साह आहे. आजच्या खाजगी शाळांच्या तुलनेत नगरपालिकेच्या या शाळेचा दर्जा उंचावत असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित असलेले पत्रकार सलीम शेख यांनी शाळेच्या या यशावर समाधान व्यक्त केले आणि भविष्यात नगरपालिकेच्या शाळा उत्कृष्ट शिक्षण देतील अशी आशा व्यक्त केली.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!