मुरगूड ( शशी दरेकर ) : सकाळची सातची वेळ मोठ्या प्रमाणात धुके बोचरी थंडी असुन सुद्धा मुरगुड मधील सामाजिक कार्यातील तरुण एकत्र आले आणि वेद गंगा नदीपात्रामध्ये जाऊन त्यात अडकलेला तब्बल अर्धा टन कचरा बाहेर काढून नदीचे पात्र स्वच्छ केले . आणि वेदगंगेने मोकळा श्वास घेतला. मुरगुड कुरणी दरम्यानच्या बंधार्याजवळ मोठ्या प्रमाणात कचरा साठला होता.
यामध्ये महापूर काळात वाहून आलेली लाकडे, प्लास्टिक बाटल्या, निर्माल्य, जुने कपडे, राख यांसारख्या कचऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली होती . तसेच पाण्यावरती तवंग आलेला दिसत होता .यामुळे नदीचे पाणी पिणाऱ्या नागरिकांमध्ये आरोग्य विषयक समस्या जाणवत होत्या .यामुळे मुरगूड मधील सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तरुणांनी सोशल मीडियावरती पोस्ट केली.
पण त्या पोस्टला म्हणावा तितका प्रतिसाद न मिळाल्यामुळे तरुणानीं स्वतःच सकाळच्या मोठ्या प्रमाणात धुके आणि बोचरी थंडी असणाऱ्या पाण्यामध्ये जात अडकलेला कचरा काढून नदीपात्र स्वच्छ केले यावेळी इथून जाणारी नागरिकांनी या तरुणांच्या या कार्याचे कौतुक केले.
शिवभक्त सर्जेराव भाट, सर्पमित्र रघुनाथ बोडके, ओंकार पोतदार,तानाजी भराडे, विशाल कापडे , जगदीश गुरव या तरुणांनी हा संपूर्ण कचरा काढून नदीपात्र स्वच्छ करण्यासाठी परिश्रम घेतले .