डॉ. मा. ग .’गुरव यांच्या निसर्ग कन्या बालकाव्य संग्रहास राज्यस्तरिय पुरस्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड–वाघापूर (ता.भुदरगड)येथील  बाल साहित्यिक  व राष्ट्रीय आदर्श प्राथमिक शिक्षक पुरस्कार प्राप्त डाॅ.मा.ग.गुरव यांच्या, ‘निसर्गकन्या’ या बाल काव्य संग्रहास मुंबईच्या वंदना प्रकाशन पुरस्कृत, राज्यस्तर ‘आशीर्वाद ‘,पुरस्कार प्राप्त झाला आहे. संस्थापक, साहित्यिक डाॅ. सुनील सावंत यांनी ही माहिती दिली असून येत्या ३०नोव्हेंबर २०२४,रोजी,दादर-माटुंगा येथील वा. ना. गोखले सभागृहात पुरस्कार वितरण केले जाणार आहे.

Advertisements

सन्मानचिन्ह व सन्मानपत्र पुरस्काराचे स्वरुप असून मुंबई विद्यापीठ माजी महापौर  डाॅ.भालचंद्र मुणगेकर, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष  डाॅ. रवींद्र शोभणे,इंग्रजी साहित्य अभ्यासक डाॅ.राजीव श्रीखंडे व आंतरराष्ट्रीय पुरस्कार सन्मानीत साहित्यिक डाॅ. सुनील सावंत या मान्यवरांचे हस्ते हा पुरस्कार देण्यात येणार आहे.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!