![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241016-WA0016-1024x1365.jpg)
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गोकुळ शिरगाव येथे NH48 हायवेवर हरीप्रसाद हॉटेल समोर एक भीषण रस्ते अपघात झाला. या अपघातात एक वाहन चालक जखमी झाला आहे. सदर अपघात दुपारी ३.१५ वाजता दरम्यान झाला.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241016-WA0015.jpg)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजितसिंग प्रतापराव पवार यांनी आपली कार (MH-09-TC-284) चालवत असताना त्यांच्यासमोर अचानक एक आयशर ट्रक (KA-12-C-2946) थांबला. यावेळी मागून येत असलेली एसटी बस (MH-14-KQ-1292) या कारला जोरात धडकली.
या अपघातात कार आणि एसटी बसचे मोठे नुकसान झाले असून, कार चालक सुरजितसिंग पवार रा.परीखपूल कोल्हापूर जखमी झाले आहेत. एसटी बसमध्ये चालक रविंद्र रामचंद्र नातलेकर रा. साळगाव पोस्ट सोहाळे ता.आजरा यांच्यावर भारतीय दंड संहिता कलम २८१, ३२४/४][५] आणि मोटार वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी घटनास्थळी धावून जाऊन जखमींना रुग्णालयात दाखल केले आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस कॉ.मांडेकर करत आहेत.
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore Im attempting to find things to enhance my siteI suppose its ok to use a few of your ideas
Wonderful blog layout! Your site loads incredibly quickly. I’d love to know your hosting provider—could you share an affiliate link if possible? I’d like my site to load this smoothly too!