मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथिल “मुरगूड शहर जेष्ठ नागरीक संघाच्या विरंगुळा केंद्रात ” आपल्या योगदानाने देशात इंजिनिअरींगच्या तंत्रज्ञानाचा पाया ज्यांनी घातला त्या भारतरत्न विश्वेश्वरैया यांची जयंती ” अभियंता दिन ” म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री . शाहू फर्नांडिस हे होते .
प्रारंभी संचालक एम .टी. सावंत यानी उपस्थितांचे स्वागत केले .
डॉ . विश्वेश्वरैया यांच्या प्रतिमेचे पूजन शाहू फर्नांडिस यांच्या हस्ते करून पुष्पहार अर्पण केला . उपस्थितानी त्यांच्या स्मृतिस अभिवादन केले . दिपप्रज्वलन उपस्थित अभियंते व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले .
संचालक जयवंत हावळ यानी प्रास्ताविकात संघाच्या कार्याची माहिती देऊन अभियंता दिनाचे महत्व कथन केले .
अभियंते शाहू फर्नांडिस, महादेव करडे, श्रीपतराव खराडे , सदाशिव एक्कल , महादेव वागवेकर , पांडूरंग चौगले , संभाजीराव आंगज, बाळासाहेब सुर्यवंशी , सुधीर गुजर , मयूर गुजर ,जयकुमार गुजर इत्यादींचा गुलाबपुष्प देऊन व पेढा भरवून यथोचित सत्कार करण्यात आला .
यावेळी सदाशिव एक्कल , संभाजी आंगज , पांडूरंग चौगले यानीं देशाच्या आभियांत्रीकी क्षेत्रात डॉ विश्वेश्वरैय्या यानी मोलाचे योगदान दिल्याचे नमूद केले .
या कार्यक्रम प्रसंगी अभियंते सुधीर गुजर ५००० रु व पांडुरंग चौगुले यांनी २००रु संघाला देऊन मौलिक हातभार लावला.
कार्यक्रमास संघाचे अध्यक्ष गजाननराव गंगापूरे, शिवाजी
सातवेकर, गणपती सिरसेकर, रंगराव चौगले, सिकंदर जमादार, विनायक हावळ, तुकाराम भारमल, चंद्रकांत जाधव, शिवाजी कांबळे, बापूसो गुजर, पांडूरंग मेंडके, लक्ष्मण गोधडे, सर्जेराव गोधडे, सदाशिव यादव, दादू मडिलगेकर, रामचंद्र रणवरे , दादू बरकाळे, प्रदिप वर्णे यांच्यासह जेष्ठ नागरीक मोठया संख्येने उपस्थित होते. शेवटी जेष्ठ सदस्य रामचंद्र सातवेकर यानीं आभार मानले.