उद्या वैद्यकीय अधीक्षकांना निवेदन देऊन कार्यवाहीसाठी दोन दिवसाचा देणार अल्टीमेटम
मुरगूड (प्रतिनिधी) : मुरगुड येथे रुग्णांवर चुकीच्या पद्धतीने उपचार सुरू असल्याची माहिती मिळाल्यामुळे नागरिकांनी डॉक्टरांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती केली. डॉक्टराची ड्युटी असताना डॉक्टरांनीं वॉर्ड बॉय च्यामाध्यमातून उपचार केल्याची माहिती नागरिकांना मिळाली यामुळे संतप्त नागरिकांनी यांच्याकडून उपचार होत असतील तर दवाखाना बंद बरा असे सांगून दवाखाना बंद करू असा इशारा नागरीकांनी दिला.
तसेच बुधवार दिनांक 21 ऑगस्ट रोजी वैद्यकीय अधीक्षक बी.डी.डवरी यांना निवेदन देऊन संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून कार्यवाही न केल्यास आंदोलनाचा इशारा देण्यात येणार आहे. यापूर्वी देखील असा प्रकार घडला आहे. मात्र जुजबी कारणे देऊन डॉक्टरांनी नागरिकांची दिशाभूल करण्याचा आरोप यावेळी संतप्त युवकांनी केला. या ठिकाणी वैद्यकीय अधीक्षक हजर नसतात तसेच डॉक्टर 24 तास उपलब्ध नसतात. स्त्रीरोग तज्ञ नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत असल्यामुळे नागरिक संतप्त झाले.

Thank you for your sharing. I am worried that I lack creative ideas. It is your article that makes me full of hope. Thank you. But, I have a question, can you help me?