कागलमध्ये शाळेच्या व्हरांड्यात अज्ञातांनी फोडल्या बिअरच्या व दारूच्या बाटल्या

शाळेच्या ऑफिसमध्ये डिझेल ओतून अनुचित प्रकार करण्याचा प्रयत्न

संत रोहिदास विद्यामंदिर मधील प्रकार

मुख्याध्यापकांचे कागल पोलीस ठाण्याला निवेदन

कागल / प्रतिनिधी – येथील श्री संत रोहिदास विद्यामंदिरमध्ये शनिवार व रविवार या दोन दिवस सुट्टीच्या कालावधीत शाळेच्या व्हरांड्यात तसेच वर्गाच्या दरवाजासमोर ५० हून अधिक बियरच्या बाटल्या फोडल्या आहेत. तसेच ऑफिसमध्ये दरवाजा मधून डिझेल ओतून शालेय इमारतीची दुर्घटना घडविण्याचा अनुचित प्रयत्न कोणी अज्ञाताने केलेला आहे. हा प्रकार करणाऱ्यांचा शोध घ्यावा, अशा मागणीचे निवेदन संत रोहिदास विद्या मंदिरचे मुख्याध्यापक गणेश माळी यांनी कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांना दिले आहे.

Advertisements
कागल – येथील संत रोहिदास विद्यामंदिरच्या व्हरांड्यात अशाप्रकारे बियरच्या व दारूच्या बाटल्या अज्ञातांनी फोडल्या आहेत

निवेदनात म्हटले आहे की, काल व परवाच्या सुट्टी कालावधीत कोणी अज्ञात व्यक्तिने साधारण ५० हून अधिक बिअर व दारूच्या बाटल्या फोडलेल्या आहेत. सोमवारी सकाळी ९ वाजता शाळेत आल्यानंतर हा प्रकार माझ्या निदर्शनास आला आहे . त्याचबरोबर शाळेच्या व्हरांड्यात तसेच प्रत्येक वर्गाच्या दरवजा समोर, शाळेच्या स्वच्छतागृहावर लाथा मारून तेथील पाण्याच्या पाईप तोडून नेल्या आहेत. गायब केलेल्या शाळा आणि शाळा परिसराच्या रात्रीच्या सुरक्षिततेसाठी नगरपालिकेकडून कंभारी कर्मचारी नागेश बिरू शेळके यांची नेमणूक केलेली आहे.

Advertisements

सदर अनुचित प्रकार पाहून फोनद्वारे शेळके यांचेशी संपर्कअसता मी बाहेरगावी असल्याचे त्यांनी मला सांगितले . सदर अनुचित प्रकार कोणी केला याचा शोध घ्यावा, असेही निवेदनात म्हटले आहे.

Advertisements
AD1

3 thoughts on “कागलमध्ये शाळेच्या व्हरांड्यात अज्ञातांनी फोडल्या बिअरच्या व दारूच्या बाटल्या”

Leave a Comment

error: Content is protected !!