विघ्नेश मगदूम, स्नेहल हवलदार, स्वरुप खरोसे, एस.पी.कांबळे, आर. वाय. पाटील यांची उपकरणे प्रथम
मुरगूड ( शशी दरेकर ) : पंचायत समिती शिक्षण विभाग कागल व मुरगूड विद्यालय जुनियर कॉलेज मुरगुड यांच्या वतीने आयोजित केलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात प्रश्नमंजुषा स्पर्धेत न्या. रानडे हायस्कूल से. कापशी च्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. उपकरण मांडणीमध्ये सहावी ते आठवी गटात महालक्ष्मी हाय. भागशाळा केनवडेचा विघ्नेश मगदूम, दिव्यांग गटात दौलतराव निकम विद्यालय ,व्हनुरच्या स्वरूप खरोसे, माध्यमिक व उच्च माध्यमिक गटात म्हाकवे इंग्लिश स्कूल म्हाकवे येथील स्नेहल हावलदार , माध्यमिक शिक्षक विभागात शहीद जवान सातापा महादेव पाटील विद्यालय बेलेवाडी मासा येथील एस .पी. कांबळे, तर प्राथमिक शिक्षक गटात विद्यामंदिर बेलेवाडी काळमा येथील उत्तम पाटील, प्रयोगशाळा परिचर गटात महालक्ष्मी हायस्कूल सावर्डे च्या आर. वाय. पाटील यांच्या उपकरणाने प्रथम क्रमांक पटकावला. या उपकरणांची जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
विजेत्यांना बक्षीस वितरण बिद्रीचे संचालक प्रवीणसिंह पाटील यांच्या अध्यक्षतेखाली गटशिक्षणाधिकारी गणपतराव कमळकर, आर .एस. गावडे, शामराव देसाई, व्ही.जी पवार, एस. आर पाटील, पी.डी.माने, टी.ए.पवार, बी.एस.खामकर, अरविंद किल्लेदार, ए.बी.कल्याणकर, एस.बी.सुर्यवंशी, एस.डी.साठे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले
गटनिहाय निकाल असा….
प्रश्नमंजुषा स्पर्धा ( मोठा गट) न्या. रानडे विद्यालय कापशी( प्रथम) सिद्धनेर्ली विद्यालय सिध्दनेर्ली( द्वितीय) मुरगुड विद्यालय मुरगुड (तृतीय)लहान गट.. दौलतराव निकम विद्यालय व्हनूर (प्रथम) शाहू हायस्कूल कागल (द्वितीय) श्रीमंत जयसिंगराव घाटगे हाय. कागल (तृतीय)
माध्यमिक उच्च माध्यमिक गट.. स्नेहल हवलदार म्हाकवे इंग्लिश स्कूल( प्रथम) ऋग्वेद मिरजे बॉईज अँड गर्ल्स हायस्कूल क. सांगाव( द्वितीय) पांडुरंग गोते मळगे विद्यालय मळगे(तृतीय) तृप्ती पाटील मुरगुड विद्यालय ज्यु. कॉ. मुरगुड (उत्तेजनार्थ) देवरथ लाड मानव हायस्कूल शेंडूर (उत्तेजनार्थ)
सहावी ते आठवी गट
विघ्नेश मगदूम महालक्ष्मी भाग शाळा केनवडे (प्रथम), सोनाली हवालदार म्हाकवे इंग्लिश म्हाकवे( द्वितीय), यश दबडे मुरगुड विद्यालय मुरगुड (तृतीय) श्रीनाथ कुंभार एम.डी विद्यालय अर्जुन नगर (उत्तेजनार्थ,) गुरु घराळ सिद्धनेर्ली विद्यालय (उत्तेजनार्थ)
माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षक गट
एस .पी .कांबळे शहीद जवान सा.म. पाटील बेलेवाडी मासा (प्रथम,) एस.डी. वर्णे सिद्धनेर्ली विद्यालय सिद्धनेर्ली (द्वितीय), डी. एस. पाटील मुरगुड विद्यालय ज्युनिअर कॉलेज मुरगुड (तृतीय)
प्रयोगशाळा परिचर गट
आर .वाय. पाटील महालक्ष्मी सावर्डे( प्रथम), दिलीप माने डी. एम. हायस्कूल सांगाव (द्वितीय,) दादासो कांबळे महात्मा फुले आनूर (तृतीय)
प्राथमिक शिक्षक गट उत्तम पाटील वि.म बेलेवाडी काळमा (प्रथम,) वसंत पालकर वि.मं.वाळवेखुर्द (द्वितीय,) व्ही.पी.ननवरे केंद्र शाळा हळदी (तृतीय)
प्राथमिक पहिली ते पाचवी गट
शुभ्रा पाटील श्रीमंत जयसिंगराव घाडगे हायस्कूल कागल (प्रथम) वैष्णवी पाटील विद्यामंदिर म्हाकवे (द्वितीय) वैष्णवी गंगाधरे म्हाकवे इंग्लिश स्कूल( म्हाकवे) तृतीय, पृथ्वीराज पाटील वि .म. कुरणी (उत्तेजनार्थ), प्राप्ती चौगुले गर्ल्स स्कूल कसबा सांगाव (उत्तेजनार्थ)
स्वागत एस. पी. पाटील यांनी प्रास्ताविक गणपतराव कमळकर यांनी केले यावेळी एस.आर.पाटील यांचे भाषण झाले. सुत्रसंचालन अनिल पाटील, एम. बी. टिपुगडे यांनी तर आभार आर. एस. गावडे यांनी मानले.