दूधसाखर महाविद्यालयची प्राची चौगले पदवी परीक्षेत मराठी विषयात विद्यापीठात प्रथम

मुरगूड ( शशी दरेकर ) : येथील दूधसाखर महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची बंडेराव चौगले ही शिवाजी विद्यापीठाच्यावतीने मार्च/एप्रिल २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या पदवी परीक्षेत मराठी विषयामध्ये विद्यापीठात गुणानुक्रमे प्रथम आली. दूधसाखर शिक्षण प्रसारक मंडळाचे व श्री इधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देवून तिला गौरविण्यात आले.

Advertisements

विद्यापीठाच्या वतीने प्रथम क्रमांकासाठी देण्यात येणारी प्राचार्य एस.के ऊर्फ बापूसाहेब उणूने तसेच डॉ.विष्णू बाळकृष्ण ऊर्फ मधू कुलकर्णी यांचे नावे देण्यात येणारी पारितोषिकेही तिला मिळाली आहेत. तिला संस्थाध्यक्ष श्री. पाटील, उपाध्यक्ष विठ्ठलराव खोराटे , सर्व संचालक मंडळ, सचिव एस. जी. किल्लेदार यांचे प्रोत्साहन व प्राचार्य डॉ.संजय पाटील, प्रा.डॉ.आनंद वारके व डॉ. प्रदीप कांबळे यांचे मार्गदर्शन लाभले.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!