मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड येथे ७७ वा भारतीय स्वातंत्र्यदिन विविध ठिकाणी मोठया उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला. नगरपरिषद, तुकाराम चौक, समाज मंदीर, लक्ष्मीनारायण पतसंस्था, सरपिराजी पतसंस्था, गणेश नागरी पतसंस्था, राजश्री शाहू, अष्टविनायक पतसंस्था, राणा प्रताप चौक अशा विविध ठिकाणी ध्वजारोहन पार पडले.
मुरगूड -शहर जेष्ठ नागरीक संघाच्या प्रांगणात स्वातंत्र्य सैनिकाचे वारसदार व_संघाचे जेष्ठ सदस्य श्री . तुकाराम भारमल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सवानिमित्य उपस्थितानां जिलेबीचे वाटप करुन आनंद व्यक्त करण्यात आला.
मुरगूड नगरपरिषदेच्या प्रांगणातही प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री. संदिप घार्गे यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले . तर मुरगूड बाजारपेठेतील ” श्री . व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या प्रांगणात डॉ. संजय रामसे यांच्या शुभहस्ते ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी शिवराज विद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थिनिनीं राष्ट्रगीत गाईले.
ध्वजारोहनानंतर कोरोणा काळात अनेकांचे प्राण वाचवणारे देवदूत म्हणून ओळखले जाणारे डॉ. रामसे यांचा यथोचित सत्कार संस्थेच्या कार्यालयात संचालक शशिकांत दरेकर यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सभापती किरण गवाणकर, उपसभापती प्रकाश सणगर, संचालक प्रशांत शहा, सातापा पाटील, शशिकांत दरेकर, धोंडीबा मकानदार, किशोर पोतदार, नामदेवराव पाटील, प्रदिप वेसणेकर, निवास कदम , संदिप कांबळे, संचालिका सौ . रोहिणी तांबट, सौ. सुनंदा जाधव, कार्यलक्षी संचालक सुदर्शन हुंडेकर, कर्मचारी वृंद उपस्थित होते.