मुरगूड ( शशी दरेकर ) : एस टी संगे तीर्थाटन योजनेंतर्गत अंगारकी संकष्टी निमित्य मुरगूडहून ७ एस टी बसेस गणपतीपुळे येथे रवाना झाल्या.
नूतन नगरसेविका सौ.सुजाता जगन्नाथ पुजारी ,स्थानक प्रमुख सागर पाटील. श्री .व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक प्रशांत शहा, पत्रकार शाम पाटील, वि. रा.भोसले ,राजू चव्हाण यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.गणपती बाप्पा मोरया च्या जयकारा ने परिसर दुमदुमून गेला.


पत्रकार दिनाचे औचित्य साधून उपस्थित पत्रकारांचा सुद्धा एस टी प्रशासनामार्फत सत्कार करण्यात आला.४ जानेवारी रोजी सुध्दा चार बसेस सोडण्यात आल्या होत्या. लाल परी मुळे आम्हाला प्रथमच समुद्र. पहायला मिळाला अशी प्रतिक्रया महिला भाविकांनी दिली.
यावेळी जगन्नाथ पुजारी यांच्यासह प्रवाशी, महिला प्रवाशी उपस्थित होते. वाहतूक नियंत्रक बाळासो परीट व दिलीप घाटगे यांनी योग्य नियोजन केले होते.