पंचायत समिती सभापतीपदी सुवर्णा पाटील व उपसभापती पदी इंद्रजीत पाटील यांची बिनविरोध निवड

कागल : आज दिनांक १० मार्च २०२६ इ. रोजी पंचायत समिती कागलचे सभापती व  उपसभापती निवड करणेसाठी सर्व नवनिर्वाचीत पंचायत समिती सदस्य यांची विशेष सभा मंगळवार दिनांक १० मार्च २०२६ रोजी दुपारी २.०० वाजता पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार कागल यांचे अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृह येथे आयोजित करणेत आली.

Advertisements

दिनांक १० मार्च २०२६ रोजी पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार कागल हे सकाळी ठिक १०.०० वाजता पंचायत समितीच्या सभागृहामध्ये स्थानापन्न झालेनंतर सभापती व उपसभापती पदासाठीचे नामनिर्देशन पत्राचे कोरे फार्मस सबंधितांना देणेत आले. नामनिर्देशन पत्र सकाळी १०.०० ते दुपारी १२.०० या वेळेत दाखल करणेचे असलेबाबत सर्वांचा सुचना देणेत आली. त्यानुसार सभापती पदासाठी सौ. पाटील सुवर्णा शशिकांत (५९ – सिध्दनेर्ली) यांचे एक नामनिर्देशनपत्र सुचक म्हणून श्रीम सुनिता सुर्यकांत माळी, सदस्यां यांनी सकाळी ११.३५ वा. दाखल केले. उपसभापती पदासाठी श्री पाटील इंद्रजीत पांडूरंग (६१ सावर्डे बु. ) यांचे एक नामनिर्देशनपत्र  सुचक म्हणून श्री.दिपक पुंडलिक सोनार, सदस्य सकाळी ११.४० वाजता दाखल केले.

Advertisements

पंचायत समिती कागलच्या सभापती व उपसभापती पदासाठी दिनांक १० मार्च २०२६ इ. रोजी दुपारी २.०० वाजता विशेष सभा आयोजित करणेत आली. सदर सभेस एकुण १२ सदस्यांपैकी १२ सदस्य हजर होते.

सभापती व उपसभापती पदासाठी नामनिर्देशनपत्रे व त्यासोबतचे इतर कागदपत्रांची छाननी पीठासीन अधिकारी तथा तहसिलदार कागल यांनी पूर्ण केली. छाननी अंती कागल पंचायत समिती सभापती पदासाठी सौ. पाटील सुवर्णा शशिकांत निर्वाचक गण क्र.५९-सिध्दनेर्ली यांचे नामनिर्देशनपत्र वैध असलेचे घोषित केले तसेच कागल पंचायत समिती उपसभापती पदासाठी श्री. पाटील इंद्रजीत पांडूरंग निर्वाचक गण क्र. ६१- सावर्डे बुद्रुक यांचे नामनिर्देशन पत्र वैध असलेचे घोषित करणेत आले. त्यानंतर उमेदवारी मागे घेण्यासाठी १५ मिनिटांचा कालावधी देण्यात आला. सदर १५ मिनिटांच्या कालावधीत उमेदवारी मागे घेण्यासाठी एकही अर्ज सादर झाला नाही.

पीठासीन अधिकारी पंचायत समिती कागल सभापती-उपसभापती निवडणूक तथा तहसिलदार कागल यांनी सभापती पदासाठी सौ. पाटील सुवर्णा शशिकांत यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केलेने व ते वैध असलेने सौ. पाटील सुवर्णा शशिकांत यांची कागल पंचायत समितीच्या सभापती पदासाठी बिनविरोध निवड झालेचे जाहीर केले. तसेच उपसभापती पदासाठी श्री. पाटील इंद्रजीत पांडूरंग (६१ सावर्डे बु. ) यांनी एक नामनिर्देशनपत्र दाखल केलेने व ते वैध असलेने श्री. पाटील इंद्रजीत पांडूरंग यांची कागल पंचायत समितीच्या उपसभापती पदासाठी बिनविरोध निवड झालेचे जाहीर केले.

पीठासीन अधिकारी पंचायत समिती कागल सभापती-उपसभापती निवडणूक तथा तहसिलदार कागल यांनी नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांचे अभिनंदन केले.

यावेळी पंचायत ‍समितीचे गटाविकास अधिकारी, श्री कुलदीप बोंगे, सहा.गटविकास अधिकारी, श्री प्रमोदकुमार तारळकर तसेच पंचायत समितीचे  सर्व   कार्यालय प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. सभापती/उपसभापती निवडणूकीचे कामकाज श्री. प्रविण भोसले, व महसूल सहाय्यक तहसिल कागल व श्री मृगेंद्र हळबे, (निवडणूक) संगणक परिचालक, तहसिल कागल. यांनी पाहिले.

Leave a Comment

error: Content is protected !!