स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे – प्रा. पांडुरंग सारंग


केनवडे (वार्ताहर) : स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श युवकांनी घ्यावा व अदर्श राजकारणी बनावे असे परखड मत प्रा.पांडुरंग सारंग यानी व्यक्त केले ते चिखली (नानीबाई)येथे पत्रकार संतराम पाटील यानी लिहिलेल्या स्वातंत्र्य सेनानी गोपाळराव देवर्षी यांचे जीवन चरीत्राचे पुस्तक प्रकाशन समारंभाच्या वेळी प्रमुख वक्ते म्हणून बोलत आसताना केले 9ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या या समारंभाच्या अध्यक्ष स्थानी दैनिक पुढारी चे पत्रकार ह भ प मधुकर भोसले होते.

Advertisements

सारंग पुढे आपल्या भाषणात म्हणाले की सध्या राजकारणात कधीही काहीही घडु शकते अशा अस्थीर मनाच्या राज्यकर्त्यांकडुन जनतेच्या अपेक्षा धुळीला मिळाल्या आहेत. मग गोपाळराव देवर्षी सारख्या स्वातंत्र्य सैनिकांचा झालेला स्वातंत्र्या साठीचा त्याग; हुतात्मा हरीबा बेनाडे आणि मल्लू चौगले यांचे बलिदान  याच्या  मुळे स्वातंत्र्य मिळाले;  पण त्या स्वातंत्र्य  सैनिकांच्या स्वप्नातील भारत कुठेच दिसत नाही.  म्हणून युवकानी राजकारण करीत आसताना आज पुढारी असलेल्यांचा आदर्श न घेता देशाच्या स्वातंत्र्य साठी बलिदान दिलेल्या आणि लढलेल्या स्वातंत्र्य सैनिकांचा आदर्श घ्यावा.

Advertisements

या वेळी गोपाळराव देवर्षी यांच्या पुस्तकाचे लेखक संतराम पाटील,फेस्कामचे कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष आर आय पाटील,श्रीकांत देवर्षी,व अध्यक्ष मधुकर भोसले यांची भाषणे झाली. एस के सिरसे यानी पाहुण्याची ओळख करून दिली. चिखली इंग्लिश स्कुल चिखलीच्या विद्यार्थीनीनी सादर केलेल्या स्वागत गिताने सुरवात झाली.

Advertisements

या कार्यक्रमासाठी संस्था अध्यक्ष अरूण देवर्षी,डी एस पाटील ,वसंत गळदगे,एस.डी पाटील,  डाॅ सुनिता  देवर्षी,माजी सरपंच सुरेश पाटील, सरपंच परिषदेचे अॅड दयानंद पाटील, अरूणराव भोसले, बाळकृष्ण संकपाळ, डी एस पाटील, वसंत गळदगे, एस डी पाटील,जग्गननाथ भोसले, हरीबा बेनाडे यांचे वंशज सावंता बेनाडे इ हजर होते शरद बोरवडेकर यानी प्रास्ताविक केले उतम कुंभार यानी सुत्रसंचालन केले तर आभार डाॅ रविंद्र देवर्षी यानी मानले

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!