मुरगूड ( शशी दरेकर ) : कुरुकली येथील घोडेकर देवाची यात्रा नुकतीच पार पडली या यात्रेला तब्बल ४ लाख भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. यात्रा झाल्यानंतर या परिसरामध्ये भाविकांनी तसेच विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात कचरा केला होता. हा सर्व परिसर स्वच्छ करण्याचे आवाहन मुरगुडच्या युवकानीं केले होते.
यानुसार पहाटे ५ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत तब्बल पाच तास मंदिर आणि परिसर स्वच्छ केला. पहाटे पाच वाजता मुरगूड येथिल शिवभक्त आणि हळदवडे, कुरणी येथील हे युवक एकत्र आल्यानंतर स्वच्छतेस सुरुवात करण्यात आली. हातामध्ये खराटा खोरी बुट्ट्या घेऊन मंदिर परिसर स्वच्छ करण्यास सुरुवात करुन सर्वप्रथम मंदिराचा समोरील भाग, मंदिराची दोन्ही बाजू, भक्तनिवास परिसर, बेनिग्रे गावाकडे जाणारा रस्ता, मंदिरा पाठीमागील डोंगर, सुरूपली गावाकडे जाणार रस्ता, कुरुकली गावाकडे जाणार रस्ता हा सर्व परिसर स्वच्छ करण्यात आला. या स्वच्छता दरम्यान तब्बल चार ट्रॉली कचऱ्याचे संकलन करून त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात आली.

शिवभक्त मुरगुडकर यांना नुकतेच उद्योगपती विनोद चौगुले यांनी स्वच्छतेसाठी साहित्य प्रदान होते . ते आज उपयोगात आणत त्यांनी ही स्वच्छता केली . शिवभक्तांनी याआधी कुरणी मंदिर, वाघापूर मंदिर, मुरगूड अंबाबाई मंदिर, शहरातील सर्व मंदिरे, तलाव परिसर, तलावाचा ओढा, वेदगंगा नदीचा ओढा, वेदगंगा नदी या ठिकाणी स्वच्छता केली असून त्यांच्या या स्वच्छतेच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या स्वच्छता मोहिमेवेळी शिवभक्त सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट, सोमनाथ यरनाळकर, ओंकार पोतदार, तानाजी भराडे, शिवाजी चौगुले, अक्षय पोतदार, जगदीश गुरव, आनंदा रामाने, अमर सुतार, प्रफुल्ल कांबळे, अमोल मेटकर, संकेत शहा, प्रकाश परिषवाड, रघुनाथ बोडके, बाळासो भराडे, भैरू बैलकर, आनंदा मोरे, नामदेव भराडे, गिरीश पाटील, अरुण पाटील, मंदिर समितीचे साताप्पा कांबळे, सुनिल कांबळे, युवराज लाटकर, विवेक कुंभार, दिनकर कुंभार यांच्यासह अनेक तरुण उपस्थित होते.