आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू करण्याची सुवर्णसंधी; कोल्हापूर जिल्ह्यात १४०० केंद्रांसाठी २२ ऑगस्टपर्यंत अर्ज करा !
कोल्हापूर : जिल्ह्यातील ग्रामपंचायत, महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्रातील एकुण 1400 नवीन आपले सरकार सेवा केद्रांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
Advertisements
अर्जाचा विहीत नमुना व अटी शर्तीबाबतची माहिती तसेच नव्याने द्यावयाच्या आपले सरकार सेवा केंद्रांच्या ठिकाणांची यादी जिल्ह्याच्या kolhapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Advertisements

इच्छुक व्यक्तींनी आपले अर्ज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथील आवक बारनिशी संकलना शेजारील कक्षामध्ये दिनांक 22 ऑगस्ट 2025 पर्यंत कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सेतू समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे.
AD1