शारीरिक, मानसिक आरोग्यावर योगा सर्वोत्तम उपाय – माजी प्राचार्य महादेव कानकेकर

मुरगूड ( शशी दरेकर ) : लोकांच्या विविध शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर मात करण्यासाठी योगा हा आज सर्वोत्तम उपाय ठरला असल्याचे प्रतिपादन माजी प्राचार्य महादेव कानकेकर यांनी केले.

Advertisements
मुरगूड : योग दिना निमित्त योगाचे महत्व सांगताना माजी प्राचार्य महादेव कानकेकर समवेत सौ. स्मिता देसाई व एनसीसी छात्र.

      मुरगूड ता. कागल येथील शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजच्या एनसीसी छात्रांनी योगा डे निमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

Advertisements

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त अध्यापिका सौ. स्मिता देसाई होत्या. यावेळी माजी प्राचार्य कानकेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी केवळ योग दिन साजरा न करता दैनंदिन जीवनात योगाचा अवलंब करण्याची नितांत गरज आहे .योगामुळे शरीर निरोगी, मनाची एकाग्रता व तणावमुक्त होण्यास मदत होते. यावेळी एनसीसी कमांडर रविंद्र जालीमसर व एनसीसी छात्र उपस्थित होते.

Advertisements
AD1

Leave a Comment

error: Content is protected !!