तलावाचे स्वच्छ पाणी पुरवठा शहराला करावा मुरगूडच्या नागरीकांचे लेखी निवेदन

मुरगूड ( शशी दरेकर ) – सरपिराजीराव तलावाचे पाणी स्वच्छ व मुबलक असताना वेदगंगा नदीचे गढूळ पाणी कशाला ? असा प्रश्न नगरपरिषदेला विचारून मुरगूडच्या नागरिकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

Advertisements

  महापुरातून वाहत येणारा गाळ, कचरा, मृत जनावरे ,लाकडे यामुळे नदीचे पाणी गढूळ होते.यात भर म्हणून नदीकाठच्या शेतातील रासायनिक खतांचा पाझर नदीत मिसळतो.असे प्रदूषित व गढूळ पाणी नागरिकांना पुरवून त्यांच्या जीविताशी खेळ का करायचा अशी विचारणा नागरीकानीं करत तसे लेखी निवेदन नागरिकांच्या वतीने नगरपरिषदेला देण्यात आले.

Advertisements

मुख्याधिकारी यांनी यावर लगेच प्रतिक्रिया देऊन नदीचे पाणी यापुढे शहराला न देता तलावाचेच स्वच्छ पाणी पुरवठा देण्यात येईल असे सांगितले.

Advertisements

  नागरिकांच्या शिष्ठ मंडळात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष रणजीतसिंह सूर्यवंशी  ,संजय भारमल, आर बी शिंदे,सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट,जगदीश गुरव,राहुल घोडके,विनायक भोसले,शिवाजी रावण, रणजीत सावंत,पंकज नेसरीकर,दत्ता हासबे इत्यादींसह नागरीकांचा समावेश होता.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!