शाहू साखर कारखान्याकडून श्री. गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त आयोजन
कागलः येथील ग्रामदैवत श्री.गहिनीनाथ गैबी पीर उरूसानिमित्त श्री.छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य कुस्ती मैदानात प्रथम क्रमांकाच्या दोन कुस्त्या झाल्या.
यामध्ये सांगलीचा संदिप मोठे याने उपहिंदकेसरी तुषार डुबे याला घुटना डावावर चितपट केले. तर दुसऱ्या कुस्तीमध्ये बारामतीचा मल्ल भारत मदने याने शाहू साखरचा मल्ल संतोष दोरवड याला हप्ते डावावर आस्मान दाखविले.
राजे आर्यवीर घाटगे,राजे वीरेंद्रसिंह घाटगे, हिंदकेसरी दीनानाथ सिंह यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात केले.
कागल येथील यशवंत किल्ला मिनी खासबाग मैदान कुस्ती शौकिनांनी खचाखच भरले होते. जवळपास अडीचशे लहान मोठ्या कुस्त्या झाल्या. दुपारी चार वाजता सुरू झालेले हे मैदान रात्री साडेआठपर्यंत सुरू होते. कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघाच्या मान्यतेने या मैदानाचे आयोजन केले होते.
द्वितीय क्रमांकाच्या कुस्तीत सांगलीच्या सुदेश ठाकूर याने बानगेच्या अरुण बोंगार्डे याला कौंदे एक चाक डावावर आसमान दाखवत प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
या मैदानातील अन्य विजयी मल्लांची नावे अशी. शशिकांत बोंगाडे (शाहूपुरी), रोहण हंडे मुरगुड किरण पाटील, विवेक चौगुले, निलेश हिरुगडे , प्रवीण वडगावकर, हर्षवर्धन एकशिंगे शाहू साखर, कुलदीप पाटील ( राशिवडे), अनिकेत पाटील (मुरगूड), प्रशांत मांगोरे (पिंपळगाव), तेजस लोहार (दऱ्याचे वडगाव)
पंच म्हणून बाळासो मेटकर, बटू जाधव, रवींद्र पाटील, नामदेव बल्लाळ, दत्ता एकशिंगे, अनिल चव्हाण, प्रवीण निकम, सर्जेराव पाटील, भैरवनाथ आरेकर, संजय वाडकर,संतोष गुजर, सचिन पाटील यांनी तर राजाराम चौगले, कृष्णा चौगले यांनी भारदस्त आवाजात निवेदन केले.
यावेळी शाहू कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, बॉबी माने, रंगराव तोरस्कर, सचिन मगदूम यांच्यासह सर्व संचालक, राजे बँकेचे अध्यक्ष एम. पी. पाटील व सर्व संचालक आदी उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याचे, शाहू साखर कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या प्रतिमेचे पूजन व मैदानाचे उदघाटन कागल पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक गजेंद्र लोहार यांनी केले.
I do believe all the ideas youve presented for your post They are really convincing and will certainly work Nonetheless the posts are too short for novices May just you please lengthen them a little from subsequent time Thanks for the post
“This is exactly what I was looking for, thank you!”