महालक्ष्मीनगर, उजळाईवाडी येथे ऑक्सिजन पार्क स्वच्छतेसाठी ग्रामस्थांचा पुढाकार

४० पोती प्लास्टिक कचऱ्याची विल्हेवाट

गोकुळ शिरगाव (सलीम शेख): करवीर तालुक्यातील उजळाईवाडी येथील महालक्ष्मीनगर मधील रहिवाशांनी नुकतीच एक कौतुकास्पद स्वच्छता मोहीम राबवली. त्यांच्याच पुढाकाराने वृक्षारोपण करून तयार केलेल्या ‘ऑक्सिजन पार्क’मध्ये ही मोहीम राबवण्यात आली, ज्यात तब्बल ४० पोती प्लास्टिक कचरा गोळा करण्यात आला. हा सर्व कचरा नंतर ग्रामपंचायत उजळाईवाडीकडे ट्रॅक्टर-ट्रॉलीतून विल्हेवाटीसाठी सुपूर्द करण्यात आला.

Advertisements

या मोहिमेत कॉलनीतील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि युवतींनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. उजळाईवाडी ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच उत्तम आंबवडे, ग्रामपंचायत सदस्य विनायक बागणे, चंदा माने, बुलगानीण कांबळे, ग्रामसेवक सरदार दिडे, तसेच आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली.

Advertisements

या स्वच्छता मोहिमेसाठी शिवराजे ग्रुप आणि शिवराजे शिवार बहुउद्देशीय प्रतिष्ठानने पुढाकार घेतला. यावेळी शिवराजे ग्रुपचे अध्यक्ष अमर गावडे, उपाध्यक्ष बंडू लोहार, सचिव राजाराम जाधव, खजिनदार भैरू सातपुते, तसेच आनंदा शिंगे, पर्यावरणप्रेमी मोहन सातपुते, नितीन पाटोळे, राजहंस योगी, अक्षय जाधव, प्रणव गुरव, विनायक लोहार, शेख चाचा, अजिंक्य तोरसकर, गिरीश शिंगे, अक्षय सावंत, आनंदा डाफळे, मोहन माने, प्रा. प्रमोद माने आणि ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

Advertisements

या सामुदायिक प्रयत्नांमुळे ‘ऑक्सिजन पार्क’ची स्वच्छता तर झालीच, पण प्लास्टिक कचरा व्यवस्थापनाच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!