उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचा घरगुती स्वरूपात सेवानिवृत्ती बद्दल सत्कार

मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल  जय शिवराय एज्युकेशन सोसायटी संचलित शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेज विभागाकडे सहाय्यक शिक्षक, उपप्राचार्य आणि माध्यमिक  विभागाकडे उपमुख्याध्यापक या क्रमाने 32 वर्ष सेवा बजावल्या नंतर नुकतेच रविंद्र शिंदे सर सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्ती समारंभ शिवराज विद्यालय व ज्युनियर कॉलेजचा स्टाफ व मान्यवरांच्या उपस्थितीत हा सेवा निवृत्ती समारंभ घरगुती स्वरूपात संपन्न झाला.   

Advertisements

         या वेळी शिंदे म्हणाले सेवानिवृत्त समारंभासाठी संस्थेच्या व शिवराज परिवाराच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष गजाननराव गंगापुरे आणि कार्यवाह अण्णासाहेब थोरवत, मंडलिक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अर्जुन कुंभार यांच्या व मान्यवरांच्या हस्ते सपत्निक सत्कार झाला.

Advertisements

      यानिमित्ताने १२५ विविध पुस्तकांची अनेक मान्यवरानी भेट देऊन त्यांचा यथोचित सत्कार केला. यानिमित्ताने स्नेहभोजनाचे आयोजन केले होते. या सेवानिवृत्त कार्यक्रम प्रसंगी शिवराज विद्यालय, मंडलीक महाविद्यालयाचा स्टाफ , सर्व सहकारी,  मित्रपरिवार, पत्रकार, आप्तेष्ट, पै- पाहुणे, जेष्ठ मंडळीनी, यानिमित्ताने त्यांना दुर्घायुष्य चिंतून शुभेच्छा दिल्या.

Advertisements
AD1

1 thought on “उपप्राचार्य रविंद्र शिंदे यांचा घरगुती स्वरूपात सेवानिवृत्ती बद्दल सत्कार”

Leave a Comment

error: Content is protected !!