कागल : कागल शहर आणि परिसरातील सुवासिनींनी वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात साजरी केली. वडाच्या झाडाजवळ महिलांची पूजेसाठी गर्दी झाली होती.
Advertisements
वटपौर्णिमेच्या निमित्ताने महिलांकडून मोगऱ्याच्या गजऱ्यांना मोठी मागणी होती. पारंपरिक पेहरावात सौंदर्य वाढवण्यासाठी गजऱ्यांचा वापर मोठ्या प्रमाणावर झाल्याने त्यांची विक्री लक्षणीय वाढली.
Advertisements

मागणी वाढल्याने गजऱ्यांच्या दरातही तीन ते पाच पट वाढ झाली, तरीही ग्राहकांनी मोठ्या उत्साहाने गजरे खरेदी केले. शहरातील बाजारपेठा आणि रस्त्यांवर गजरे विकणाऱ्या विक्रेत्यांनी चांगला व्यवसाय केला. पारंपरिक सणांमुळे स्थानिक व्यवसायांना चालना मिळते.

कागल-सांगाव रस्त्यावरील वडाची झाडे रस्ता रुंदीकरणामुळे तोडल्याने काही महिलांनी अंगणात कुंडीतील वडाच्या झाडाची पूजा करून वटपौर्णिमा साजरी केली.
AD1