मुरगूड ( शशी दरेकर ) : हमिदवाडा ता. कागल येथिल सदाशिवराव मंडलिक कागल तालुका सहकारी साखर कारखान्याचे संस्थापक चेअरमन लोकनेते सदाशिवराव मंडलिक यांचा सातवा स्मृतिदिन उद्या गुरुवार दि. १o रोजी सकाळी ११ वाजता कारखाना कार्यस्थळावर विविध उपक्रमानी साजरा होत आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. सागर देशपांडे उपस्थित राहणार आहेत. तर बाबासाहेब यशवंत पाटील (सरूडकर ) हे अध्यक्षस्थान भूषवणार आहेत, खा. प्रा. संजयदादा मंडलिक यांच्या उपस्थितित कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमास सर्व सभासद, बिगर सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कत्राटदार, व्यापारी, हितचिंतकानीं उपस्थित राहावे असे आवाहन उपाध्यक्ष बापूसाो पांडूरंग भोसले-पाटील, कार्यकारी संचालक एन्. वाय. पाटील व संचालक मंडळाने केले आहे.