![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2025/01/IMG-2020062.jpg)
मुरगुडच्या दोन तरुणांचा स्तुत्य उपक्रम पाहुन ग्रामस्थानी केले कौतुक
मुरगूड (शशी दरेकर) : नववर्षाच्या सुरुवातीला मुरगूडच्या सर पिराजीराव तलावाची स्वच्छता मुरगूड येथील शिवभक्त सर्जेराव भाट आणि ओंकार पोतदार या दोन तरुणांनी पुढाकार घेत केली. 31 डिसेंबर तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात पार्ट्या करण्यात आल्या होत्या. तलावाच्या पात्रातच चुली मांडून त्याच ठिकाणी पत्रावळ्या, प्लॅस्टिकचे ग्लास व कचरा टाकून तरुण निघून गेले होते.
मात्र या दोन तरुणांनी तलाव परिसरातून 3 किलोमीटर परिसरातून तीनशे बाटल्यांचा खच आणि पत्रावळ्या, प्लॅस्टीक ग्लास , वाटया व जेवणानंतर उरलेले साहित्य, प्लास्टिकच्या बाटल्या आणि अन्य कचरा यावेळी जमा केला. तलावाच्या पात्रामध्येच अनेक तरुणांनी जेवणावळी केल्या होत्या. त्याची मोठी दुर्गंधी सुटली होती.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2025/01/img-20250101-wa00645756422808117210006.jpg)
मात्र सकाळी बोचऱ्या थंडीत साडेसात वाजता तलाव स्वच्छतेचा प्रारंभ केल्यानंतर तब्बल तीन तास या दोन तरुणानी या ठिकाणी राबत कचरा आणि मद्याच्या बाटल्या गोळा करून नववर्षाचे स्वागत 31 डिसेंबर च्या जेवणावळींचा कचरा आणि मद्याच्या बाटल्या गोळा करून स्वच्छता करत एक वेगळा उपक्रम राबविला. हा उपक्रम राबविल्याबद्दल या तरुणांचे ग्रामस्थाकडून व परिसरातून सर्वत्र कौतुक होत आहे.
“Well explained, made the topic much easier to understand!”