व्हनाळी(सागर लोहार) : आपल्या महान कार्याने कोल्हापूरच नव्हे तर महाराष्ट्र आणि देशामध्ये सामाजिक परिवर्तन आणणाऱ्या राजर्षी शाहू महाराजांची आज 100 वी पुण्यतिथी. लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी वर्षानिमित्त साके,व्हनाळी,केंबळी, केनवडे ता.कागल परिसरात शाहू राजांना सकाळी ठिक 10 वाजता 100 सेकंद स्तब्धता ठेवून विविध मान्यवर, अधिकारी, सरपंच, सदस्य, विद्यार्थी,शिक्षक, कर्मचारी,ग्रामस्थांच्या उपस्थीतीत आदरांजली वाहून त्यांना विविध ठिकाणी मानवंदना देण्यात आली.
श्री अन्नपुर्णा शुगर अण्ड जॅगरी वर्क्स लि. केनवडे ता.कागल येथे कारखाना कार्यस्थळावर लोकराजा शाहू महाराज यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलतांना चेअरमन संजयबाबा घाटगे म्हणाले, ही स्तब्धता म्हणजे आपल्या आवडत्या राजाला, रयतेच्या राजाला, शाहू महाराजांना त्यांच्या 100 व्या स्मृती दिनानिमित्त केले जाणारे सामूहिक वंदन आसल्याचे सांगून त्यांनी राजर्षी शाहू महाराजांनी रयतेसाठी, समाजासाठी केलेल्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून त्यांनी व्यक्त केला. यावेळी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पुजन अन्नपुर्णाचे चेअरमन संजयबाबा घाटगे यांचे हस्ते करण्यात
आले.
यावेळी शिवाजी शेवडे, प्रकाशकुमार माने, हंबिरराव पाटील, इंद्रजीत पाटील, बाळासो जाधव, कृष्णात कदम, दिग्वीजय सुर्यवंशी, विनायक चौगले, रानोजी घोरपडे, आनंदा पाटील, सतीश नरके, विष्णू पाटील, तानाजी कांबळे, पंकज चव्हाण, उमाजी पाटील आदी कारखाना कर्मचारी उपस्थीत होते.
साके ता.कागल येथे विद्या मंदिर साके प्राथमिक शाळा,सुभद्रामाता हायस्कुल, ग्रांमपंचायत कार्यालयात शाहू राजांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी ज्ञानदेव पाटील,बाळासाहेब तुरंबे, सरपंच सो.सुशिला पोवार,उपसरपंच निलेश निऊंगरे,सदस्य संदपदा पाटील,रविंद्र जाधव,युवराज पाटील,मोहन गिरी,विद्यार्थी,शिक्षक,ग्रामस्थ उपस्थीत होते.
व्हनाळी ता.कागल येथे ग्रामपंचायत,प्राथमिक शाळा,विविध विकास सेवा संस्था,पतसंस्धा,दुध संस्थेमार्फत शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यात आली.