मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड पोलिस स्टेशनचे कर्यंतप्तर सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवाजीराव करे यांची नुकतीच तडकापडकी बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीचा आदेश प्राप्त झालेनंतर त्यांच्या ठिकाणी करवीर पोलिस विभागातून बाळासाहेब सरवदे यांनी मुरगूड पोलिस स्टेशनमध्ये हजर राहून कार्यभार स्वीकारला आहे.
जमाबंदीचा आदेश असतानां मुरगूडमध्ये निषेध आंदोलन कसे झाले याचा ठपका ठेऊनच करे यांची बदली जिल्हा पोलिस प्रमुख यानी केल्याची माहिती समोर येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत मुरगूड येथिल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याविषयी चुकीची माहिती दिल्याबद्दल मुरगूडमध्ये गुरुवारी आंदोलन आले होते.