जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त कागल ग्रामीण रुग्णालयात तंबाखूमुक्तीची शपथ

कागल : कागल येथील ग्रामीण रुग्णालय येथे ३१ मे २०२५ रोजी जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त  तंबाखूचे दुष्परिणाम आणि कर्करोगाशी संबंधित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित सर्वांनी तंबाखू मुक्तीची शपथ घेतली.

Advertisements

यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. थोरात मॅडम यांनी तंबाखू सेवनामुळे होणाऱ्या गंभीर परिणामांवर प्रकाश टाकला. डॉ. धनंजय पाटील आणि डेंटिस्ट प्रियांका किल्लेदार मॅडम यांनी कर्करोग आणि मुख आरोग्यावर तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत सविस्तर माहिती दिली.

Advertisements

डॉ. सुलभा पाटील मॅडम, आरोग्य निरीक्षक आर.पी. दांगट, इन्चार्ज सिस्टर श्रीमती भारती चोथे, दंत सहाय्यक गणेश गोंधळी यांच्यासह रुग्णालयाचे कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!