बेनिक्रे येथे एकाच रात्रीत तीन बंद घरे फोडली

तिन्ही घरात काहीच न मिळाल्याने चोरटे हात हलवत परतले

मुरगूड ( शशी दरेकर ) :  बेनिक्रे ता.कागल येथे एकाच रात्रीत तीन बंद घरांचे कडी, कुलपे तोडून चोरीचा प्रयत्न केला.यामध्ये दोन घरातील तिजोऱ्या फोडून साहित्य विस्कटून टाकले तर एक घरातील कपड्यांचा ट्रंक फोडून साहित्य विस्कटून फेकले गेले आहे.

Advertisements

या तिन्ही घरात चोरट्यांना काहीच हाती लागले नाही त्यामुळे तिन्ही घरे फोडून चोरटे हात हलवत गेले पण या चोऱ्यामुळे गावात घबराट पसरली आहे.पोलिसांनी आणखी गस्त वाढवण्याची मागणी होत आहे.

Advertisements

         या बाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की; बेनिक्रे येथील अशोक सदाशिव जाधव, वसंत सदाशिव जाधव  हे दोघे भाऊ काही कामानिमित पुणे येथे गेले आहेत तर सोनाबाई महादेव ढेरे आपले घर बंद करून दुसऱ्याच्या घरी गेल्या होत्या एकाच गल्लीतील ही तिन्ही बंद घरे हेरून या घरांचे कडी कोयंडा तोडून आत प्रवेश केला यामध्ये जाधव बंधूंच्या दोन्ही घरातील तिजोऱ्या फोडल्या आहेत.

Advertisements

यामध्ये काही किंमती मिळतो का हे शोधण्यासाठी तिजोरीतील सर्व साहित्य विस्कटून टाकले आहे . पण या दोन्ही घरात चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही म्हणून त्यांनी त्याच गल्लीतील सोनाबाई महादेव ढेरे यांच्या बंद घराकडे मोर्चा वळवला . तेथे पत्र्याची ट्रंक घराबाहेर  शेजारील शेतवडीत फोडलेला त्यामध्येही त्यांना काही हाती लागले नाही.

Advertisements

        आज सकाळी घटनास्थळी जाऊन मुरगूड पोलिसांनी माहिती घेतली आहे. पुण्याला गेलेले जाधव बंधू गावी आल्यावरच यामध्ये  चोरांच्या हाती नेमके काय लागले काय हे कळणार आहे. पण या दोन्ही घरात मौल्यवान काही नव्हते असे त्यांनी पोलिसांना सांगितल्याचे समजते.

AD1

Leave a Comment

error: Content is protected !!