मुरगूड ( शशी दरेकर ) : कोल्हापूर जिल्हा सहकार बोर्डाची
पंचवार्षिक निवडणूक माजी खास. संजय मंडलिक यांच्या नेतृत्वाखाली सलग तिसऱ्यांदा बिनविरोध झाली.
Advertisements
२१ जागांसाठी झालेल्या या निवडणूकीत ३ संचालक मुरगूडचेच असल्याने सहकार बोर्डात मुरगूडचा वरचश्मा राहिला आहे.
Advertisements

यामध्ये इतर मागासवर्गीय प्रवर्गातून येथील प्रवीण पांडूरंग सुर्यवंशी, भटक्या व विमुक्त जाती मधून दीपक महादेव माने तर महिला गटातुन शकुंतला बाजीराव गोधडे यांनी संचालकपद मिळवण्याचा मान पटकावला आहे.
सहकार श्रेणी अधिकारी मिलिंद ओतारी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. या निवडीकामी माजी खास. संजयदादा मंडलिक, ॲड वीरेंद्र मंडलिक यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
AD1