कागलमध्ये बनावट नंबर असलेली गाडी विकून ४ लाखांची फसवणूक; तिघे जेरबंद

कागल : बनावट इंजिन आणि चेसिस नंबर (Engine and Chassis Number) असलेली अर्टिगा गाडी विकून एका व्यक्तीची ४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार कागलमध्ये उघडकीस आला आहे. या प्रकरणी कागल पोलिसांनी (Kagal Police) तीन आरोपींना अटक केली आहे.

Advertisements

संदीप वसंतराव नाळे (वय ५१, रा. जयसिंगराव पार्क, कागल) यांनी कागल पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ३ ते ५ मे २०२५ दरम्यान तीन आरोपींनी संगनमत करून बनावट नंबर असलेली अर्टिगा गाडी नाळे यांना ४ लाख रुपयांना विकली. नाळे यांनी फोन-पे (PhonePe) आणि रोख स्वरूपात ही रक्कम आरोपींना दिली होती.

Advertisements

धक्कादायक बाब म्हणजे, ७ मे २०२५ च्या रात्री २ वाजून १० मिनिटांनी आरोपींनी नाळे यांच्या पार्किंगमधून तीच अर्टिगा गाडी चोरून नेली. यानंतर संदीप नाळे यांनी वारंवार चार लाखांची मागणी केली असता, त्यांना गाडी परत मिळाली नाही आणि पैसेही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलिसांत धाव घेतली.

Advertisements

या प्रकरणी ओमकार चंद्रकांत भालेकर (रा. वाकी वसाहत, कसबा सांगाव, ता. कागल), ओंकार पाटील (रा. रेंदाळ, ता. हातकणंगले) आणि गणेश रतनलाल शर्मा (नाव खरे खोटे माहीत नाही) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. कागल पोलीस ठाण्याचे निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार विजय पाटील पुढील तपास करत आहेत.

Leave a Comment

error: Content is protected !!