मुरगूड विद्यालयात महाहादगा बोळवण
मुरगूड (शशी दरेकर) : आई बाबा आई बाबा करीन तुमची सेवा,झाडे लावू निसर्ग वाचवू,एक झाड लावू बाई दोन झाडे लावू अशी निसर्ग गीत सादर करत मुरगूड ता. कागल येथील मुरगूड विद्यालय ज्युनि. कॉलेज मधील हजारो विद्यार्थिनींनी हादग्याचे बोळवण केले. यावेळी लेक वाचवा, झाडे लावा, झाडे जगवा, लेकीला शिकवा, मुलगा मुलगी दोघे समान माना. मतदान करा,लोकशाही मजबूत करा अशा घोषणा देऊन प्रबोधन करण्यात आले. हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील हजारो विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
यावेळी या महाहादग्याचे पूजन केल्यानंतर सण साजरे करत असताना आपण आपले सण विसरत चाललो आहे. आपली संस्कृती जपली पाहिजे.आपल्या जगात महान असणाऱ्या संस्कृती चा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे चालवण्यासाठी आणि सणांची माहिती शालेय जीवनातच विद्यार्थ्यांना होण्यासाठी शालेय आवारात सण- उत्सव साजरे करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन शिक्षण प्रसारक मंडळाच्या चेअरमन डॉ मंजिरी देसाई मोरे यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य एस पी पाटील तर प्रमुख उपस्थिती म्हणून ऋतुजा मोरे, सुहासिनीदेवी प्रवीणसिंह पाटील उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी हस्त देवतेचे पूजन व दीपप्रज्वलन डॉ मंजिरी देसाई मोरे, ऋतुजा मोरे, सुहासिनीदेवी पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी वाय.ई.देशमुख ,एस.एस. पाटील, व्ही एस सुर्यवंशी, यू.पी.कांबळे ,जे.टी.पवार, जे.व्ही.पाटील,एस.आर.भोई,बी.वाय.मुसाई,व्ही.एस. गुरव, एन.एम.पाटील, सुप्रिया बाईत,अश्विनी गोरूले, अश्विनी नलवडे,एम.टी.राऊत आदी उपस्थित होते.
स्वागत आणि प्रास्ताविक टी एस पाटील यांनी केले. सूत्रसंचालन के.एस.पाटील, व बी वाय मुसाई यांनी केले तर आभार एल.के.पाटील यांनी मानले.