गोकुळ शिरगाव(सलीम शेख): गोकुळ शिरगाव येथील छत्रपती शाहू महाराज नगर महालक्ष्मी कॉलनीमध्ये 19 डिसेंबरच्या रात्री अडीच ते तीनच्या दरम्यान चोरीची घटना घडली. या घटनेत घरमालक रफिक जमादार यांच्या बंगल्यात राहणारे समीर रमजान कुरणे हे भाड्याने राहतात यांच्या घरातून चोरी झाली. चोरीच्या वेळी घरातले बाहेरगावी असल्याने घरात कोणीच नव्हते. दरवाजाच्या कडी कोंडा कटावणीने तोडून घरातील तिजोरी फोडून रोख रक्कम 15000 व नवीन नळ 24 नग अंदाजे 1000किमतीचे 24000 एकूण 30 ते 35 हजारची चोरी झालेली आहे.नळ काढून चोरीला गेल्यामुळे पूर्ण बंगल्यात पाणी झालेले आहे. घरातील नळ चोरीला गेल्याने आश्चर्य करत आहेत.
अलीकडच्या काळात गोकुळ शिरगाव परिसरात चोऱ्यांचा सिलसिला वाढला आहे. वर्षभरात अनेक चोऱ्यांच्या घटना घडल्या असून, यामध्ये मोठ्या प्रमाणातील चोऱ्यांचा समावेश आहे. या चोऱ्यांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महालक्ष्मी कॉलनीमध्ये या वर्षभरात अनेक चोऱ्या झाल्यामुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली आहे. घराला कुलूप लावून गावी किंवा कार्यक्रमांना जाण्यास नागरिक घाबरत आहेत.
या वाढत्या चोऱ्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामपंचायत आणि पोलीस ठाण्याने त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या पातळीवर सुरक्षा उपाययोजना करून चोऱ्यांना प्रतिबंध करण्याचा प्रयत्न करावा.