
गोकुळ शिरगाव(सलीम शेख) : येथील महालक्ष्मी एंटरप्रायझेस कारखान्यात सोमवारी रात्री चोरीची घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी कारखान्याचे कुलूप तोडून अंदाजे ६६ हजार रुपये किमतीचे ॲल्युमिनियम कास्टिंग चोरून नेले.
या प्रकरणी गोकुळ शिरगाव पोलिसांनी सचिन दत्तात्रय गवळी (वय ३५, रा. राजेंद्रनगर, कोल्हापूर) याला अटक केली आहे. पीडित व्यंकटेश सोमराज यांनी याबाबत पोलिसात फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, चोरट्यांनी कारखान्यातून ५५० किलो वजनाची २३ पोती ॲल्युमिनियम कास्टिंग चोरून नेली होती. पोलिसांनी आरोपीकडून काही प्रमाणात चोरीचा माल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
महत्त्वाचे मुद्दे
* गोकुळ शिरगाव पोलिसांचा यशस्वी कारवाई
* एमआयडीसीतील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह
* चोरीच्या घटनांमध्ये वाढ, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.