मुरगुड : कागल तालुक्यातील मुरगुड येथील एका घरात अज्ञात चोरट्यांनी खिडकीचा गज वाकवून प्रवेश करत अंदाजे ६०,००० रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी दि. ११/१०/२०२५ रोजी सायंकाळी ६.०० वाजेपासून दि. १२/१०/२०२५ रोजी सकाळी ९.०० वाजेच्या दरम्यान घडली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.
नेमकी घटना: या घटनेची फिर्याद कु. धनश्री अनिल रनवरे (वय २३, धंदा-घरकाम, रा. मुरगुड, ता. कागल, जि. कोल्हापूर) यांनी दिली आहे. फिर्यादीच्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या मुरगुड येथील ज्ञानेश्वर कॉलनीतील घराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या खिडकीचा गज वाकवून घरात प्रवेश केला. त्यानंतर तिजोरीतील सोन्या-चांदीचे दागिने व रोकड असा एकूण सुमारे ६०,००० रुपये किमतीचा ऐवज चोरीस गेला आहे.

चोरीस गेलेला ऐवज (अंदाजित किंमत):
१) ३५,०००/- रु. किमतीचे एक सोन्याचे मणीमंगळसूत्र (अर्धा तोळा वजनाचे)
२) ५,०००/- रु. किमतीच्या २ लहान मुलांच्या साखळ्या (चांदीच्या)
३) ५,०००/- रु. किमतीच्या ३ भार वजनाचे व १ भार वजनाचे दोन चांदीचे पैंजण
४) १५,०००/- रु. किमतीच्या भारतीय चलनी ५००, २००, १००, ५० रु. च्या चलनी नोटा (रोकड)
एकूण अंदाजित किंमत: ६०,०००/- रु.
चोरट्याने फिर्यादीच्या संमतीशिवाय व लाभासाठी हे साहित्य चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद आहे. मुरगुड पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.दं.वि. कलम ३७९, ४५४, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोहेकॉ एस. वाय. वर्णे करत आहेत.