आरोपीने चुकीची माहिती दिल्याबद्दल तीव्र संताप
मुरगूड ( शशी दरेकर ) – कोल्हापूर येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण च्या पथकाने मुरगुड तालुका कागल येथे गांजा विकताना पकडलेल्या प्रमोद पांडुरंग भोई याचा कुस्ती अथवा पैलवान क्षेत्राशी काहीही संबंध नाही. त्याने पोलिसांना दिलेली माहिती चुकीची असून त्यामुळे पैलवानांच्या भावना दुखावल्या आहेत. मुरगुड शहरासह परिसरातील सर्व गांजा उच्चाटणासाठी पैलवान संघटनाच अग्रेसर राहील असे उदगार माजी उपगराध्यक्ष दगडू शेणवी यांनी काढले.
मंगळवारी आलेल्या बातमी मध्ये सदर आरोपीचा पैलवान म्हणून उल्लेख झाला आहे. सदरचा युवक पैलवान नसताना हा उल्लेख आरोपीने पोलिसांना चुकीची माहिती दिल्याने झाला.मुरगूड ला कुस्तीचे माहेर म्हटले जाते राज्यभरातून शेकडो मल्ल याठिकाणी कुस्तीचा सराव करण्यासाठी येतात. त्यामुळे या सर्वांपर्यंत चुकीचा संदेश जाऊ नये यासाठी शहरातील सर्व पैलवानानी एकत्र येत आपल्याला भावना व्यक्त केल्या.

यावेळी माजी नगराध्यक्ष सुखदेव येरुडकर यांनी ही याबाबत नाराजी व्यक्त करत पैलवान हा स्वतःचं शरीर सदृढ करण्यासाठी अहोरात्र मेहनत करत असतो. तो व्यसनापासून दूर असतो. जर असे चुकीचे वर्तन होत असेल तर त्याला आखाड्यात जागा नसते. त्यामुळे हा गांजा विकणारा आरोपी पैलवान नसून त्याचा कुस्ती क्षेत्राशी काही संबंध नसल्याचे त्यांनी सांगितले.

माजी नगरसेवक दत्तात्रय मंडलिक यांनी संतप्त भावना व्यक्त करत पैलवान संघटनेच्या माध्यमातून शहरात अथवा शहराबाहेर असे गैर कृत्य करणाऱ्याना पकडून चांगला धडा शिकवून पोलिसांच्या ताब्यात देऊ तसेच आपण सर्वानी मिळून शहरातून गांजा हद्दपार करूया असा विश्वास व्यक्त केला.यावेळी वस्ताद पांडुरंग पुजारी, युवराज सूर्यवंशी, प्रवीण मांगोरे यांनी ही मनोगत व्यक्त केले. यावेळी दादासो लवटे,राजू चव्हाण,सचिन मगदूम,आंनदा लोखंडे,सुनील शेलार, सुरेश शिंदे ,गजानन खराडे,शिवाजी मोरबाळे,गणेश तोडकर,पृथ्वीराज कदम ,सातापा डेळेकर, राजू शेणवी, राजू मुजावर,आकुश मांगले,अमर उपलाने,सत्यजित चौगले,मयूर सावर्डेकर,तानाजी साळोखे,समाधान बोते आदी प्रमुख उपस्थित होते.