मुरगूड : खेबवडे तालुका करवीर येथील स्मशान भूमीत एक बाहुली,काळया कपड्यात उडिद, नारळ, लिंबू, ड्रिल, टाचण्या, अंडे, तंबाखू चुना,राख असे बरेच काही एका टोपलीत बांधून मृतदेह जाळतात त्या ठिकाणी बांधून ठेवले होते. स्मशानभूमीत मृतदेह जाळण्यासाठी दोन जागा असल्याने दोन्ही ठिकाणी हा प्रकार केला होता व एक ठिकाणी पांढऱ्या कपड्यात गुंडाळून बाहुली टाकली होती.हा प्रकार ग्रामस्थांच्या लक्षात येता परिसरात भीतीच वातावरण निर्माण झाले होते.

हा प्रकार तेथील जागृत नागरिकांनी अंधश्रधा निर्मूलन समिती मुरगूड शाखेला कळवताच. मुरगूड शाखेने तप्तरता दाखवून घटना स्थळी भेट दिली व स्थानिक नागरिकांच्या उपस्थितीत सर्व करणी सोडवून ग्रामस्थाना दाखवण्यात आली व त्याची विल्हेवाट लावण्यात आली.हा अघोरी प्रकार केवळ भिती दाखवण्यासाठी व फसवण्यासाठी केले जात असून या करणीने कुणाचंही कसलही नुकसान होत नाही त्यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही असे उपस्थितांना सांगण्यात आले.

लोकांमधील भीती दूर करून त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण करण्याच्या या मोहिमेत अंधश्रधा निर्मूलन समितीचे भीमराव कांबळे (कुरणी), शंकरदादा कांबळे (उंदरवाडी), स्मिता कांबळे (बिद्री) व सचिन सुतार (निढोरी) आदी कार्यकर्ते उपस्थित होते. त्याच बरोबर गावातील डी वाय पाटील, संपत पाटील, प्रताप मगदूम, विवेक मिठारी, कुमार साबळे, अमोल चौगले, रवींद्र पाटील, शुभम जोंधळे, बालकृष्ण पाटील यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.