![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/IMG-20241021-WA0012.jpg)
पुजारी पण त्यावेळी मंदिरात
कोल्हापूर(सलीम शेख) : करवीर तालुक्यातील गडमुडशिंगी येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. येथील नरसिंह मंदिर विहिरीत कोसळल्याने मंदिर आणि त्यात पूजा करीत असलेले पुजारी कृष्णात उमराव दांगट (64) हे विहिरीत पडून गेले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/img-20241021-wa00068978348998928508422.jpg)
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढल्याने विहिरीच्या काठावरील जमीन कमजोर झाली होती. रविवारी सकाळी, दांगट हे मंदिरात पूजा करीत असताना अचानक मंदिर विहिरीत कोसळले. या घटनेनंतर ग्रामस्थांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. अग्निशमन दल आणि स्थानिक बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. मात्र, विहिरीची खोली आणि दलदलीची जमीन यामुळे बचावकार्यात अडचणी येत आहेत.
![](https://gahininathsamachar.com/wp-content/uploads/2024/10/img-20241021-wa00108696444065849352462.jpg)
कृष्णात दांगट हे गावचे प्रसिद्ध शेतकरी होते. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांना दोन मुले, एक मुलगी आणि नातू असा मोठा परिवार आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभागावर प्रश्नचिन्ह या घटनेनंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बचावकार्यासाठी आवश्यक साधने नसल्याने शोधकार्य रखडले.
राजकीय नेते घटनास्थळी: कोल्हापूर दक्षिणचे आमदार ऋतुराज पाटील आणि अन्य स्थानिक नेते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी प्रशासनाला तातडीने बचावकार्य पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत.
गावकऱ्यांमध्ये हळहळ: या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. दांगट कुटुंबाच्या या दुःखात सर्वच लोक सहभागी झाले आहेत.
बचावकार्य सुरू: अंधारामुळे रविवारी रात्री शोधकार्य थांबवण्यात आले होते. सोमवारी सकाळपासून पुन्हा शोधकार्य सुरू करण्यात आले आहे.
“Amazing post, keep up the good work!”
Usually I do not read article on blogs however I would like to say that this writeup very compelled me to take a look at and do so Your writing taste has been amazed me Thanks quite nice post