मुरगूड ( शशी दरेकर ) :
दिपावलीच्या मंगलमय सणानिमित्य समाजामधील घटकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावेत व परस्परातील संवादाची देवाण – घेवाण व्हावी यासाठी मुरगूडमधील माजी नगराध्यक्ष मा . प्रविणसिंह पाटील ( दादा ) (संचालक, दुधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना बिद्री ) यांच्या परिवारातर्फे ” फराळ स्नेह – मिलन ” कार्यक्रम नव्याने बांधलेल्या त्यांच्या वास्तूच्या हॉलमध्ये पार पडला.
या ” फराळ स्नेहमिलन ” कार्यक्रमात विविध क्षेत्रातील मान्यवरानी व नागरीकानीं उपस्थिती लावली. राजकीय मतभेद बाजूला ठेऊन मान्यवरानीं व नागरीकानीं फराळाचा आस्वाद घेतला.
या कार्यक्रमासाठी प्रविणसिह पाटील (दादा) यांच्यासह दिग्वीजय पाटील (भैया), सत्यजित पाटील (आबा),शिवाजीराव देशमुख ( महासंचालक महाराष्ट्र राज्य साखर कारखाना ) , माजी नगराध्यक्ष पांडूरंग भाट, किरण गवाणकर , एस .व्ही. चौगले (सर), सुखदेव येरुडकर, नामदेवराव मेंडके, दगडू शेणवी, बाजीराव गोधडे, आनंदा मांगले, सुहास खराडे, मुरगूड पोलिस स्टेशनचे पी.एस.आय. विकास बडवे, मुरगूड पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनिल डेळेकर, श्याम पाटील( दै . पुढारी ), प्रकाश तिराळे (दै . सकाळ), अनिल पाटील (दै. लोकमत), प्रविण सुर्यवंशी (दै .महान कार्य), समिर कटके, रविंद्र शिंदे (दै. तरूण भारत), महादेव कानकेकर (दै. पुण्यनगरी) राजू चव्हाण ( दै . तुफान क्रांती) संदिप सुर्यवंशी, शशी दरेकर (गहिनिनाथ समाचार), जे.के कुंभार, औकार पोतदार यांच्यासह व्यापारी, विविध बँकेचे, पतसंस्थेचे पदाधिकारी, मुरगूडमधील सर्व गटाचे आजी माजी नगराध्यक्ष, नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, नागरीक उपस्थित होते .