कोल्हापूर( प्रा.सुरेश डोणे) : चिखलव्हाळ(ता.निपाणी)येथील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे.(सध्या राहणार पुणे)यांची बैलजोडी अखिल मंडई मंडळ,पुणे श्री.शारदा गजानन मंदीर महात्मा फुले मंडई या गणपती मंडळाच्या यावर्षीच्या मिरवणूक रथाचे मानकरी ठरली आहे.याचे पत्र श्री.शारदा गणपती ट्रस्टच्या वतीने आयोजक मा.सचिन पांडुरंग काटे यांना देण्यात आले.
यापूर्वी देखील मा.आप्पासाहेब बाबुराव काटे यांची बैलजोडी श्री.संत ज्ञानेश्वर महाराज,श्री.संत तुकाराम महाराज व भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक गणेशोत्सव यांच्या पालकीचे मानकरी ठरले आहेत. यावेळी बोलताना मा.आप्पासाहेब बाबुराव काटे म्हणाले की,आमची बैलजोडी यावर्षी रथाची मानकरी ठरली याचा मला सार्थ अभिमान आहे.केवळ विविध मंडळांच्या रथाचा मान मिळतो यासाठीच बैलजोड्या पाळण्याचा आम्हांला छंद आहे व आम्हीं यातच धन्य मानतो.
चिखलव्हाळ(ता.निपाणी)परिसरात आनंद व्यक्त…
चिखलव्हाळ(ता.निपाणी) हे मा.आप्पासाहेब बाबुराव काटे यांचे मुळ गाव.काटे यांच्या बैलजोडी बरोबरच गावाचे नाव लौकिक होत आहे.बेंदूर सणानिमित्त गावामध्ये काटे बंधूंच्या बैलजोडींची भव्य मिरवणूक ग्रामस्थ तसेच पंचक्रोशीतील भजनी मंडळाच्या उपस्थितीत काढण्यात आली होती.यामुळे चिखलव्हाळ परिसरात आनंद व्यक्त केला जात आहे.