
गोकुळ शिरगाव (सलीम शेख): सौ. आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेज गोकुळ शिरगाव (ता. करवीर) येथे 24वा वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला. एसएससीचे सहसंचालक बी.एम. किल्लेदार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात विद्यार्थी, शिक्षक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या कार्यक्रमात शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थी आणि शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.
तसेच उपस्थित आजीमाझी ग्रामपंचायत सरपंच,सदस्य, पत्रकार, संघातील पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक यांचा पण सत्कार करण्यात आला. शाळेचे संस्थापक अध्यक्ष के.डी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्य कामना केली.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमांनी सर्वांचे मनोरंजन केले. कोळीगीते, मराठी गोंधळीगीते, छत्रपती शिवाजी महाराजांवरील नाटक आणि पार्टी गीते यांनी कार्यक्रमाला रंगत लावली.

या कार्यक्रमास एसएससी चे असिस्टंट सेक्रेटरी बी.एम किल्लेदार, एस एम लोहिया संस्थेचे सेक्रेटरी डीएम हेरवाडे, आर वाय पाटील, सुनील पाटील, भैरू केसरकर, गोकुळ शिरगाव च्या उपसरपंच नूतन पाटील, सातापा कांबळे, रणजीत पाटील, दिनकर मगदूम, दत्ता पाटील (वस्ताद), बबन शिंदे, संग्राम पाटील, तसेच सौ आंबुबाई पाटील इंग्लिश मीडियम स्कूलचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.