मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता. कागल येथिल हिरकमहोत्सवाकडे घोडदौड करणारी व सहकार क्षेत्रात गरूडझेप घेणारी श्री. लक्ष्मी नारायण नागरी सहकारी पतसंस्थेची ५९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि .०३ ऑगष्ट २०२५ रोजी दुपारी ठिक ०२ वाजता संस्थेच्या मुख्य कार्यालयाच्या सभागृहात बोलविण्यात आली आहे. संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदानां काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि .२९ जुलै पर्यंत संस्थेकडे लेखी स्वरूपात द्याव्यात व ३ ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे चेअरमन किशोर पोतदार , व्हा . चेअरमन दत्तात्रय कांबळे व सर्व संचालक मंडळासह कार्यलक्षी संचालक नवनाथ डवरी यानी केले आहे.
Advertisements