मुरगूड ( शशी दरेकर ) : मुरगूड ता . कागल येथील आदर्श पतसंस्था पुरस्काराने गौरवलेली व सर्वपरिचीत म्हणूण ओळख असलेली श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्थेची ३७वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २४/०८/२०२५ रोजी दुपारी ठिक १ वाजता मुरगूडच्या साई आखाडा हॉल येथे सपन्न होणार आहे.
संस्थेच्या कामकाजाबाबत सभासदाना काही प्रश्न विचारावयाचे असतील तर दि . १८ / ८ / २०२५ इ . रोजी पर्यंत संस्थेच्या कार्यालयात लेखी स्वरूपात द्यावेत व २०२५ मध्ये झालेल्या १०वी १२वी च्या परिक्षेत चांगल्या गुणानीं उत्तीर्ण झालेल्या सभासदांच्या मुला-मुलीनी आपल्या मार्कलिस्टच्या नक्कला व अर्ज दि .२० / ८ / २०२५ इ रोजीपूर्वी संस्थेच्या कार्यालयात आणून द्याव्यात

व २४ऑगष्ट रोजीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी सभासद बंधू -भागिनीनीं वेळेवर उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे सभापती सोमनाथ यरनाळकर उपसभापती राजाराम कुडवे व सर्व संचालक मंडळासह कार्यलक्षी संचालक राहुल शिंदे यानी केले आहे .