शिक्षक संघटनेची कोल्हापूर जिल्हाधिकार्यांकडे मागणी
कागल(विक्रांत कोरे): बारावीच्या परीक्षांना प्रारंभ होत असताना पर्यवेक्षणाच्या पद्धतीत बदल करून शिक्षकांची मुस्कटदाबी केली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या मध्ये असंतोष पसरला आहे. त्यात तात्काळ बदल करावा अशी मागणी कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघाने जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बारावी विद्यार्थ्यांचा अभ्यास ऑनलाईन पद्धतीने सुरू होता. त्यामुळे भयमुक्त व तणावमुक्त परीक्षा देण्यासाठी पुणे शिक्षण मंडळाने त्या -त्या कनिष्ठ महाविद्यालयात परीक्षा घेण्यात याव्यात असे निश्चित केले होते.
मात्र पर्यवेक्षकांनी साखळी पद्धतीने परिक्षण करावे असा आदेश पारित केला आहे.अनेक महिला शिक्षक आहेत. इतर केंद्रात जाणे त्यांना त्रासाचे ठरणार आहे .जिल्हाधिकाऱ्यांच्या नवीन निर्णयाने गोंधळात गोंधळ होणार आहे. आता परीक्षा सुरू होत आहेत. कोणताही गोंधळ न माजवता शिक्षकांना ज्या -त्या ठिकाणी परीक्षणाचे काम द्यावे.
ते प्रामाणिकपणे काम करतील, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक एसटी दुर्गी प्राध्यापक संजय मोरे सचिव प्राध्यापक बीके मडिवाळ प्राध्यापक सुनील जगताप दादा लाड अनिल चव्हाण कैलास सुतार रवींद्र मोरे पाटील मॅडम कुडतरकर मॅडम सोनवणे मॅडम शिंदे मॅडम यांच्यासह शिक्षक पदाधिकारी उपस्थित होते.