गोकुळ शिरगाव (सलीम शेख) : गोकुळ शिरगाव पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत अशोक लेलँड ट्रकच्या टायर चोरीचा गुन्हा काही तासांतच उघडकीस आणला आहे.
पोलिसांनी सुमारे १ लाख ३० हजार रुपये किमतीचे चोरी केलेले टायर जप्त केले असून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत करण्यात आली. २५ जानेवारी २०२५ रोजी दुपारी २ वाजता विजयानंद पेट्रोल पंप, कणेरीवाडी येथे KA.28 AA.8375 क्रमांकाच्या ट्रकचे १० नवीन टायर बदलून जुने टायर लावले गेले.
नवीन टायरची चोरी त्याचवेळी करण्यात आली. हे टायर मनगोळी सप्लायर्स कंपनी, विजापूरचे होते. फिर्यादीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास सुरू केला.
पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत दोन आरोपींची ओळख पटवली. सिध्दाप्पा लक्ष्मण कटबर (वय २३, रा. भुयार, ता. इंडी, जि. विजापूर, कर्नाटक व रविंद्र कांतु शिंदे (वय ३२, रा. खेडशी सिताई पार्क, ता. रत्नागिरी, जि. रत्नागिरी) यांना २९ जानेवारी २०२५ रोजी रत्नागिरी जिल्ह्यातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. १ लाख ३० हजार रुपये किमतीचे ट्रकचे टायर जप्त.दोन्ही आरोपींना अटक करून पोलीस कोठडीत ठेवण्यात आले आहे.या गुन्ह्यात पोलिसांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून आरोपींना शोधून काढले, हे विशेष उल्लेखनीय आहे.
या कारवाईत पोलीस अधिक्षक कोल्हापूर महेंद्र पंडीत, अपर पोलीस अधिक्षक, शहर विभाग,जयश्री देसाई, उपविभागीय पोलीस अधिकारी, करवीर विभाग, कोल्हापुर सुजीतकुमार क्षीरसागर, गोकुळ शिरगाव सहा पोलीस निरीक्षक टि .जे .मगदुम मॅडम, पोलीस उप निरीक्षक आप्पासो घाटगे, पो. कॉ संदेश कांबळे, नितेश कांबळे, गोपनीय अधिकारी भरत कोरवी, पो. कॉ. संदेश पोवार, पो. कॉ. किरण मोरे, चालक पो.कॉ. आनंदा भोईटे यांचा समावेश होता.