कागल (विक्रांत कोरे) : कोल्हापूर येथे झालेल्या प्रोऍक्टिव्ह अबॅकस नॅशनल कॉम्पिटिशन (रीजनल लेवल) या अबॅकस स्पर्धेत कोल्हापूर, सिंधुदुर्ग, सांगली व सातारा या जिल्ह्यातून एकूण 1200 विद्यार्थी सहभागी झाले होते.
यात हॉलिडेन इंग्लिश मीडियम स्कूल, कागल चा अश्वजीत प्रवीण कांबळे हा इयत्ता दुसरी 4:13 सेकंदामध्ये 100 पैकी 100 गुण मिळून पहिला तर साजिद सलिम नदाफ इयत्ता दुसरी हा 3:43 सेकंद 100 पैकी 99 गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला आहे. यानंतर इयत्ता चौथीतील विहार प्रविण कांबळे हा विद्यार्थी 5:31 सेकंदामध्ये 100 पैकी 98 गुण घेऊन त्याच्या गटांमध्ये दुसरा क्रमांक पटकवलेला आहे.
यासोबत इयत्ता दुसरीतील विभा सर्जेराव पाटील यांनी 5:44 सेकंदामध्ये 100 पैकी 97 गुण मिळवून चौथा तर इयत्ता पाचवी मधील वेदांती विनोद पाटील हिने 100 पैकी 75 गुण तिच्या गटांमध्ये पाचवा क्रमांक मिळवलेला आहे.
स्पर्धेत हॉलीडेन स्कूलच्या 20 पेक्षा जास्त मुलांनी उत्कृष्ट कामगिरी करत पारितोषिक मिळवले आहे.
या सर्व मुलांना स्कूल मधील स्टेट मुख्याध्यापक श्री. विजय पाटील सर,सीबीएसई च्या मुख्याध्यापिका सौ.तेजस्विनी अडनाईक मॅडम,उदय पाटील सर, इतर शिक्षक व सुयश प्रो ऍक्टिव्ह अबॅकस,वैदिक गणित च्या संचालिका सौ.सुमैय्या सलिम नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले.