सुळकूड (प्रा.सुरेश डोणे) – जिद्द, चिकाटी व परिश्रम यामुळे जीवनामध्ये यश प्राप्त करता येते.विद्यार्थ्यांनी कोणत्याही संकटांना घाबरून न जाता त्याला धैर्याने सामोरे जाणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आभ्यासामध्ये सातत्य ठेवून ध्येयाच्या दिशेने वाटचाल केल्यास हमखास यश प्राप्त होते असे प्रतिपादन शिवाजी विद्यापीठाच्या मॅनेजमेंट कौन्सिलचे सदस्य प्रा. अमरसिंह रजपूत यांनी केले.
ते महाराष्ट्र लिबरल एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर संचलित सुळकूड हायस्कूल सुळकूड येथे सन २०२३-२४ या बॅचचा शुभेच्छा समारंभ प्रसंगी बोलत होते.अध्यक्षस्थानी स्कूल कमिटी सदस्य श्री.विवेक पाटील हे होते.तर प्रास्तावित मुख्याध्यापक श्री.वाय.एस.धामांण्णा पाटील यांनी केले.
प्रा.अमरसिंह रजपूत पुढे म्हणाले की,आज विद्यार्थ्यांच्या समोर अनेक आव्हाने आहेत ती स्विकारुन जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत न हार मानता त्याला धैर्याने सामोरे जाणे महत्वाचे आहे त्याचबरोबर शिक्षणातील काळानुरुप बदल स्विकारणेही गरजेचे आहे.
इयत्ता दहावी,आठवी व नववीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी आपली मनोगते व्यक्त केली. तसेच सौ. संकपाळ मॅडम,सौ.माने मॅडम, श्री.मोरे सर तसेच सेवानिवृत्त शिक्षक आय.एम. मुजावर सर यांनी विद्यार्थ्यांना आपल्या मनोगतातून शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले.
यावेळी प्रा.एस.एन.तेली मुख्याध्यापक,शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी वर्ग, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री.पी.एस.मोरे यांनी केले तर आभार श्री.एस.एन.खाडे यांनी मानले.
This page is phenomenal. The splendid substance exhibits the essayist’s commitment. I’m overwhelmed and expect more such unfathomable posts.
helloI like your writing very so much proportion we keep up a correspondence extra approximately your post on AOL I need an expert in this space to unravel my problem May be that is you Taking a look forward to see you