शिवराज विद्यालयात हरित सेनेच्या वतीने फटाकेमुक्त दिवाळी अभियान
मुरगूड ( शशी दरेकर ) : पर्यावरण संवर्धन भाषणातून नको तर प्रत्यक्ष कृतीतून व्हावे. विद्यार्थ्यांनी आतापासून स्वतःला पर्यावरणाचे रक्षक बनवावे. प्रत्यक्ष कृतीतून निसर्गप्रेम जोपासावे. असे प्रतिपादन वृक्षमित्र प्रविण सुर्यवंशी यांनी केले. ते शिवराज विद्यालय येथे फटाकेमुक्त दिवाळी अभियान अंतर्गत राष्ट्रीय हरित सेनेच्या वतिने आयोजित कार्यक्रमात मार्गदर्शन करतांना बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्राचार्य पी.डी. माने होते.
यावेळी आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पी.डी . माने म्हणाले, विद्यार्थांनी प्रत्येक शालेय उपक्रमातून सहभागी होऊन स्वतःस सिध्द करावे. पर्यावरणाचे रक्षकच पर्यावरण शुद्ध ठेवू शकतात . ही भावना अंगी बाणवून घ्यावी. यावेळी हरितसेनेच्या विद्यार्थ्यांनी फटाके मुक्त दिवाळी साजरी करण्या बाबतची सामुदाईक प्रतिज्ञा घेतली.
या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक एस एच पाटील, पर्यवेक्षक एस बी भाट , बी आर मुसळे, व्ही बी खंदारे, एस एस मुसळे, एस डी कांबळे , एकनाथ आरडे , सौ . एस जे कांबळे, सौ स्मीता देसाई सौ गायत्री डवरी , रणजित चव्हाण, एस् एस् सुतार , पी डी ढोणूक्षे , वाय एस पाटील , एन एच चौधरी आदी शिक्षक वृंदासह राष्ट्रीय हरित सेनेचे विद्यार्थी – विद्यार्थिनी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे स्वागत आर ए जालिमसर यांनी , प्रास्ताविक अविनाश चौगले यांनी , सुत्रसंचालन पी .डी . रणदिवे यांनी तर आभार संदीप मुसळे यांनी मानले .
फटाके मुक्त दिवाळी प्रतिज्ञा
दिवाळी सणामध्ये फटाके फोडल्याने फटाक्यातून बाहेर पडणाचा धूर व वायू मुळे हवा प्रदूषित होते , त्याच बरोबर फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनी प्रदूषण होते. म्हणून पर्यावरणाची काळजी घेण्याची जबाबदारी माझी आहे . हे मी कर्तव्यपूर्वक जाहिर करून मी राष्ट्रीय हरितनेचा विद्यार्थी अशी शपथ घेतो की, दिवाळी सणामध्ये मी फटाके फोडणार नाही . आणि माझ्या मित्रपरीवारालाही फटाके फोडण्यापासून परावृत्त करीन. “माझी वसुंधरा – माझा निसर्ग – स्वच्छ ठेवणे माझे कर्तव्य. ” असे प्रतिज्ञापत्र सादर करणेत आले .
Nice post!